Pimpri News : चिखली : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली स्पाइनरोडवर २५ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास रस्त्याने जाणार्या तोंडओळखीच्या तरुणाला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. चिखली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
प्रकाश उर्फ गणेश श्रीगोंडा (रा. काळेवाडी) व महादेव या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात राजकुमार महादेव कल्याणी (वय 24 रा.मोशी) याने तक्रार दिली आहे.
तक्रारदार राजकुमार कल्याणी रस्त्याने चालत जात असताना आरोपींनी त्याला थांबवून त्याच्याकडे ५०० रुपये मागितले. त्याने नकार दिल्यावर त्याला दमदाटी, शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवत त्याच्या खिशातून ९०० रुपये काढून घेतले.
हा प्रकार पाहून राजकुमार कल्याणी याला सोडविण्यासाठी आजूबाजूचे लोक आले असता त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवून आरोपी पसार झाले.
Discussion about this post