व्हीएसआरएस मराठी न्युज -राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यातील १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यानचा हा दौरा असणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबई तसेच रत्नागिरी या दोन ठिकाणी वास्तूंचे उद्घाटन होणार आहेत.
त्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि १२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी असा त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यानंतर १३ फेब्रुवारीला राष्ट्रपती हे तेलंगणा दौऱ्यावर असतील.
याआधी राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईतील राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथीवल दरबार हॉलचे उद्घाटन होणार होते. पण काही कारणास्तव हे उद्घाटन पुढे ढकलले गेले. ११ फेब्रुवारीला राजभवनात नव्याने उभारण्यात आलेल्या दरबार हॉलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती मुंबईत येणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या मंत्र्यांचा शपथविधी हा दरबार हॉल येथे पार पडतो. त्याशिवाय अनेक शासकीय महत्वाच्या कार्यक्रमासाठी दरबार हॉलची एक वेगळी परंपरा आहे.
त्याशिवाय १२ फेब्रुवारीला राष्ट्रपतींचा दौरा हा रत्नागिरीच्या अंबावडे गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनासाठी असणार आहे. या उद्घाटनानंतर राष्ट्रपतींचा पुढचा दौरा हा तेलंगणाचा असणार आहे. तेलंगणा येथे राष्ट्रपती १३ फेब्रुवारीला दौरा करणार आहेत. त्याठिकाणी संत रामानुज सहस्त्राब्दी समारोहासाठी राष्ट्रपतींची उपस्थिती असणार आहे. तसेच श्री रामानुजाचार्य यांच्या सोनेरी पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे.
Discussion about this post