Pune News : पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील वजनदार स्थानिक नेते संजोग वाघेरे यांनी आता राष्ट्रवादीशी फारकत घेत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत आज दि. २७ डिसेंबर रोजी दिले.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्षे मी काम करत आहे.मी शरद पवार किंवा अजित पवार यांच्यावर मी नाराज नाही. स्थानिकनेत्यांवर माझी नाराजी नाही. मात्र, खासदार व्हायची माझी मनापासून इच्छा आहे. २०१४ पासून मी त्याची तयारी करत आहे. मात्र मला पक्षाकडून संधी मिळाली नाही. पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणखी पाच वर्षे मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित राहणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदेगटाला दिला गेला आहे. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे वाघेरे म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी वाघेरे यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात मोठीच खळबळ उडाली होती.
Discussion about this post