व्हीएसआरएस न्युज देशात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू असताना अशाच परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे शुक्रवारी पुण्यात निधन झाले.
ही बातमी ताजी असतानाच आता राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. तब्येतीत बिघाड झाल्याने मागील काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते.
यापूर्वी सहाडा येथील आमदार कैलाश त्रिवेदी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते. तर त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपण्यात आली होती. आमदार किरण माहेश्वरी यांना महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे केरोनाची लागण झाली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.