व्हीएसआरएस मराठी न्युज –फिफा वर्ल्ड कपचा ब्लॉकबस्टर अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियम झाला. फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही तगड्या संघाच्या खेळाडूंनी जोरदार खेळ दाखवला.
मात्र, मेस्सीच्या अर्जेंटिनाने चार पावले पुढे टाकत फ्रान्सला धूळ चारली. हा रंगतदार फिफा वर्ल्ड कप २०२२चा अंतिम सामना जिंकत अर्जेंटिनाने मोठा इतिहास रचला आहे.
फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना रविवारी फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही बलाढ्य संघात झाला. या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सवर पेनाल्टी शुटआऊटमध्ये ४-२ च्या गोल फरकाने विजय मिळवला. मेस्सीच्या अर्जेंटिनाने तब्बल ३६ वर्षांनंतर फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. अर्जेंटिना आतापर्यंत तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. अर्जेंटिनाने याआधी १९७८ आणि १९८६ साली फिफा विश्वचषक जिंकला होता.
९० मिनिटाच्या खेळानंतर ८ मिनिटांचा भरपाई वेळ देण्यात आला. या वेळेत एमबाप्पेला गोल करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर ज्यादा वेळेत सामना खेळवण्यात आला. या ज्यादा वेळेच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, फ्रान्सच्या चांगल्या बचावामुळे अर्जेंटिना करू शकली नाही. अखेर ज्यादा वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाकडून मेस्सीने गोल करत ३-२ ने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.
११७ व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. एमबाप्पेने वैयक्तिक आणि संघासाठी तिसरा गोल केला. त्यानंतर ज्यादावेळ संपेपर्यंत ३-३ अशीच बरोबरी राहिली. त्यामुळे सामना पेनल्टीशुट आऊटमध्ये गेला.
अर्जेटिनाचा कर्णधार आणि फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अखेर साकार झाले. रविवारी झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ अशी सरशी साधताना अर्जेटिनाने तिसऱ्यांदा विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान मिळवला.
माझ्या आईसोबत एका छोट्याशा टीव्हीवर वर्ल्डकप स्पर्धा बघितल्याचं आठवतं. तोच उत्साह आता माझ्या मुलांसोबत बघताना आहे. आम्हाला सर्वांना प्रतिभा, कठोर मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावल्याबद्दल खासकरून मेस्सीचे आभार!, असं शाहरूख खान यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Discussion about this post