व्हीएसआरएस मराठी न्युज -आकुर्डीमधील दत्तनगर व मोहननगर भागात मोठ्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागातील असिस्टंट हॉटी सुपरवायजर संजीव प्रल्हाद राक्षे, माळी काम करणारे मच्छिंद्र नामदेव कडाळे, भरत रामभाऊ पारखी यांना निलंबित केले असून, खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
दत्तनगर व आकुर्डीमधील मोहननगर भागामध्ये ठेकेदाराच्या काही कामगारांकडून २० ते २५ मोठी झाडे तोडण्यात आली. या कामगारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही झाडे तोडली असल्याचे सांगितले. त्यामध्ये फायकस १४, पेल्ठाफोरम ६, चिंच १ अशा २१ झाडांच्या फांद्या तोडल्या तर सुबाभूळ व वड अशा दोन झाडांची अवैधपणे वृक्षतोड करण्यात आली. यानंतर या वृक्षतोडीची तक्रार आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांकडे पर्यावरणप्रेमींनी केली. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. तक्रारीनंतर उद्यान विभागाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
मात्र एवढ्या वृक्षांची तोडणी झालेली असतानाही अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने प्रशासनावर चौफेर टीका झाली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वृक्षतोड प्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. अखेर या वृक्षतोडीमध्ये सहभागी असलेले उद्यान अधीक्षक संजीव राम्रो, माळी काम करणारे मका, भरत पारखी यांना निलंबित करण्यात आले आहे.
Discussion about this post