व्हीएसआरएस न्युज पिंपरी
केंद्र सरकारच्या महागाई दरवाढ विरोधात “शिव आक्रोश जन आंदोलन” शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले यांच्या नेतृत्वामध्ये (दि.२५) रोजी सकाळी १०.३० वा. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर चौक, पिंपरी येथून सुरू होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे इंधन, गॅस तसेच जीवनाश्यक वस्तूच्या दरवाढी विरोधात चौकात महिलांनी चूल पेटवून त्यावर भाकरी बनवली तसेच दोन चाकी वाहन बैलगाडी मधे ठेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काळया फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष भोसले म्हणाले की,केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल.
यावेळी खासदार-श्रीरंग बारणे, शिवसेना प्रदेश
संघटक-गोविंद घोळवे, शहर प्रमुख-अॅड. सचिन भोसले, मा. आमदार-गौतम चाबुकस्वार, महिला संपर्क प्रमुख-सौ. वैशालीताई सुर्यवंशी, जिल्हा संघटीका-सुलभाताई उबाळे सह आदी उपस्थित होते.
Discussion about this post