व्हीएसआरएस मराठी न्युज –ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो चालक आणि मालक यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो चालक आणि मालक फेडरेशनच्या वतीने पुणे ते दिल्ली ड्रायव्हर जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १ जानेवारीपासून या यात्रेला पिंपरी चिंचवड पुणे येथून सुरुवात होणार आहे. या मध्ये देशभरातील चालक, मालक सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन होणार असल्याची माहिती ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्र येथून हे रॅली निघणार असून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब मार्गे दिल्ली येथे पोहोचणार आहे. दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 रोजी आंदोलन होणार आहे. देशभरामध्ये 25 कोटी चालक-मालक ड्रायव्हर यांना कोणतीच सामाजिक सुरक्षा नाही. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.
Discussion about this post