व्हीएसआरएस मराठी न्युज –
माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी (मंगळवार, ९ जानेवारी) सुनावणी पार पडली.
सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. ज्यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला.
Discussion about this post