व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजें निंबाळकर, एकनाथ खडसे शिवसेनेचे आमशा पाडवी आणि सचिन अहीर, भाजपचे श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, आणि प्रवीण दरेकर यांचा विजय झाला. ही सर्व मते पहिल्या पसंतीची होते.
काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात खरी काटे की टक्कर होती. मात्र दोघांच्या लढाईत चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. काँग्रेस च्या दोन्ही उमेदवारांना आपला 26 मतांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. महाविकास आघाडीची हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालामुळे महाविकास आघाडीत एकी नाही हे पुन्हा एकदा दिसून आले.
चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसने पक्षाचा आदेश त्यांत्याच आमदारांनीच धुडकावला आहे. एकंदरीत काँग्रेस नेत्यांनी पक्षशिस्तीला हरताळ फासला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पहिला उमेदवार पराभूत झाला आहे. तर दुसरा उमेदवार जिंकला आहे. काँग्रेसचा उमेदवार पराभव झाल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा झटका मानला जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ भाई जगताप यांच्या विजयावर समाधान मानावे लागले आहे.
Discussion about this post