Breaking News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील चिखली पोलीसठाण्यातील एका सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत खात्याने आज दि. १७ डिसेंबर रोजी लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
नरेंद्र लक्ष्मण राजे (वय 54) असे या सहायक फौजदाराचे नाव आहे. त्याच्याविरोधात एका ३२ वर्षांच्या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदाराच्या गाडीचा अपघात झाला असून या संदर्भात चिखली पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही गाडी तक्रारदाराला परत देण्यासाठी नरेंद्र राजे यांनी त्याच्याकडे दीड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक लाख रुपये घेण्याचे कबूल केले. त्या पैकी 13 डिसेंबर रोजी 15 हजार रुपये व 15 डिसेंबर रोजी 55 हजार रुपये राजे यांनी स्वीकारले आहेत. रविवारी २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना चिखली पोलीसठाणे येथे लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Discussion about this post