व्हीएसआरएस मराठी न्युज -मुस्लिम बांधवांचा चाकण जवळील नाणेकरवाडी (ता. खेड) येथे दोन दिवसीय इस्तेमा सुरू झाला असून यामध्ये हजारो भाविकांचा सहभाग आहे. या इस्तेमामध्ये सहभागी होणाऱ्या हजारो मुस्लिम धर्मियांना धर्मगुरू मार्गदर्शन केले . शनिवारी (दि. 17) सकाळी सुरु झालेल्या या इस्तेमा रविवारी (दि.18) संध्याकाळी समारोप झाले.
पुणे नाशिक महामंगावर चाकण जवळील नाणेकरवाडी (ता. खेड) हद्दीतील सुमारे 100 एकर जमिनीवर मंडप तयार करण्यात आला आहे. निव्वळ मंडपच नाही तर यात तब्बल 1 लाख लोकांच्या मुक्कामाची, खाण्या-पिण्याची आरोग्याची आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संखेने भाविक येत असतानाही या भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली असल्याचे कार्यक्रमस्थळी वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
याठिकाणी पुणे जिल्ह्यातील 25 ते 30 हजाराहून अधिक भाविक हजेरी होती .
Discussion about this post