व्हीएसआरएस मराठी न्युज -वाकड येथील आय. आय. ई.बी.एम, आणि फिटीस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने जवानांच्या सन्मानार्थ इंडस बिझिनेस स्कूल, वाकड पुणे येथे रविवार, दि. १८/ रोजी विजय दिवसच्या निम्मिताने सोल्जरॅथॉन- विजयरन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये १५० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उदघाट्न हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी झेंडा दाखवून चालू करण्यात आला.
यावेळी आय. आय.ई.बी.एमचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह, व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, सह अधिष्ठाता डॉ. भारती कालिया, डॉ. विशाल भोळे, समन्वयक बापू पवार सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत
मॅरेथॉन मोठ्या उस्साहात पार पडली.
या वेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. विवेक मुगळीकर यांनी १९७१ रोजी भारतीय सेनेने पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विजय दिवसानिमित्त पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांची आठवण करून दिली. या विजय दिनाच्या आयोजनामुळे भारताच्या उज्वल इतिहासाची माहिती समाजात पोचण्यास मदत होणार आहे. यातून तरुणांना प्रेरणा मिळेल. त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल. देशासाठी काहीतरी करायची प्रेरणा जागृत होईल. असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमामध्ये इंडस बिझनेस स्कूल व इंडस चॅम्प्स स्कूलच्या विद्यार्थांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयेश त्रिपाठी, अपूर्व नागर, विवेक लिंबाळकर, हर्ष परमार, विवेक पटेल, तपन सिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.
Discussion about this post