व्हीएसआरएस मराठी न्युज -माजी गृहमंत्रीअनिल देशमुख यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातून ते बाहेर आले.
देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर आज बुधवारी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले.
100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आज सव्वा वर्ष म्हणजे 13 महिने 26 दिवसांच्या कोठडीनंतर ते बाहेर आले आहेत.
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेलबाहेर स्वागतासाठी हजेरी लावली. अनिल देशमुख यांची सुटका होणार, या बातमीनंतर आर्थर रोड तुरुंगाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली.
आर्थर रोडबाहेर टायगर इज बॅक, हौसला बुलंद रहे, अशा आशयाचे बॅनर घेतलेल्या कार्यकर्त्यांची जेलबाहेर प्रचंड गर्दी जमा झाली आहे.
अनिल देशमुख यांच्या मतदारसंघ असलेल्या नागपूर विभागामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर नागपूर मध्ये केव्हा दाखल होतात याची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणखी काही दिवस अनिल देशमुख यांची नागपूर मध्ये घेणे संदर्भात वाट पहावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनानंतर अनिल देशमुख यांना तीन महिने तरी मुंबई सोडता येणार नसल्याची माहिती अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून मिळाली आहे.
Discussion about this post