व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी या अपूर्णावस्थेतील मार्गावर घाईघाईत मेट्रो प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांना त्याचा फायदा होत नसून, ती नागरिकांची एक प्रकारे फसवणूक आहे. अपूर्णावस्थेतील मेट्रो बंद करावी. स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू झाल्यानंतर तो मार्ग सुरू करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या गुरूवारी (दि.६) दुपारी एकला मेट्रो रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी ५.८ किलोमीटर अंतर मेट्रो धावत आहे. या मार्गावरील कामे अद्याप पूर्ण नसून, स्टेशनची कामे अपूर्ण आहे. फुगेवाडी व दापोडीच्या पुढे संथ गतीने काम सुरू आहे. स्वारगेटपर्यंत मेट्रोचे काम होण्यास एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लागेल. अर्धवट मार्गावरील मेट्रोला नागरिकांचा प्रतिसादही मिळत नसून, मेट्रो रिकामी धावते, स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू झाल्यानंतर ती सुरू करावी.
तोपर्यंत मेट्रो बंद ठेवावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी एक वाजता पिंपरी मेट्रो स्टेशनवर आंदोलन केले जाणार आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी हेमंत सोनवणे ह्यांना ईमेल करुन मेट्रो रेल्वे बंद करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना ईमेल करुन मेट्रो रेल्वे बंद करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली पुणे जिल्हाधिकारी व नरेंद्र मोदी ह्यांना सुद्धा मेट्रो रेल्वे बंद करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो रेल्वे घाईगडबडीत उद्घाटन कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी आँनलाईन पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला होता फुगेवाडी ते पुणे मेट्रो रेल्वे काम संथ गतीने सुरू असलेल्या मुळे भविष्यात दोन वर्षे मेट्रो रेल्वे प्रवास करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे?
पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो रेल्वे रिकामी फिरत असून लाखो रुपये नुकसान होत आहे नागरिक मेट्रो रेल्वे प्रवास अपूर्ण असल्याने फिरकत नाही पाठ फिरवली आहे नागरिकांनी मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा जेणेकरून नागरिकांना मेट्रो रेल्वे प्रवास सुखकर होईल अपूर्ण प्रवासात होत आहे त्यामुळे मेट्रो रेल्वे बंद करण्याची मागणी सचिन काळभोर यांच्या कडुन करण्यात आली आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी हेमंत सोनवणे यांची प्रतिक्रिया —
तुमची ई-मेल द्वारा विनंती मिळाली. पुणे मेट्रो हा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनी द्वारा उभारण्यात येत असलेला प्रकल्प आहे. मेट्रो चे संचालन संपूर्ण सरकारी नियमानुसार चालविले जाते.
येत्या काही महिन्यात मेट्रो फुगेवाडी ते सिविल कोर्ट पर्यंत विस्तारणार आहे. त्यानंतर व उर्वरित सर्व मार्ग पूर्ण झाल्यावर अपेक्षित प्रतिसाद मिळेल.
कुठलाही मोठा प्रकल्प टप्या टप्यानेच प्रवाश्यांसाठी खुला
केला जातो, मेट्रो देखील त्याला अपवाद नाही.
तरी आपल्याला विनंती करत आहोत की आपला मेट्रो रोको हा नियोजित कार्यक्रम मागे घेण्यात यावा.
Discussion about this post