व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तो चर्चेचा विषय ठरत आहेत.
सुमारे दीड महिना ‘आयसीयू’तील उपचारानंतर आमदार लक्ष्मण जगताप हे घरी आले. त्यानंतर १० जून व २० जून रोजी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी ते कार्डियाक रुग्णवाहिकेने मुंबईला गेले होते. त्यानंतर ते घरीच आराम करीत आहेत. सोमवारी ते घराबाहेर पडले. पिंपळे गुरव येथील निवासस्थानाहून ते नवी सांगवीतील न्यू मिलेनियम शाळेत गेले. तेथे त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन केले. दरम्यान, नुकताच त्यांचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी काल झेंडावंदनही केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह संचारला आहे.
आमदार जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे-पाटील, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महापालिकेतील पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा सभापती नवनाथ जगताप यांनी लक्ष्मण जगतापांची पिंपळे गुरव येथील घरी जाऊन भेट घेतली.
जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सर्वजण राजकीय जोडे बाजूला ठेऊन त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीला कसलाही राजकीय संबंध नसला तरी या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Discussion about this post