व्हीएसआरएस मराठी न्युज -मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर धमकी देऊन तीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. २१ वर्षीय रुपेश मोरे यांना धमकी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी भारती पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी भारती पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘३० लाख दे, नाहीतर लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करेल’, अशी धमकी वसंत मोरे यांच्या मुलाला मिळाली आहे.
वसंत रुपेश मोरे यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर त्यांच्या मुलासाठी धमकीचा मेसेज आला आहे. ‘अल्फिया शेख या मुलीसोबत विवाह झाले आहे’ असे ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवले आहे.
‘आम्ही बनावट लग्नाचं प्रमाणपत्र तयार केलं आहे. खराडी आयटी पार्कच्या समोरील वाहनात वीस लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही तुमच्या अत्याचारासाठी गुन्हा दाखल करू’ असा धमकीचा मेसेज आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला. ‘मी अल्फिया शेख असून ३० लाख रुपये नाही दिल्यास अत्याचाराची तक्रार करून तुरुंगात पाठवेन. अशा पद्धतीचा मेजेस पाठण्यात आला आहे.
Discussion about this post