व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल (गुरुवारी) नोटीस बजावली आहे. राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ या बंगल्याची अंतर्गत तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे.
‘के’ वेस्ट वॉर्डकडून ही नोटीस देण्यात आली आहे. बंगल्याच्या आतील काही बांधकाम विनापरवाना करण्यात आले आहे का? याची महापालिका पहाणी करणार आहे.
दरम्यान, नारायण राणेंच्या अधिश बंगल्याबाबत बांधणीसाठी सादर केलेल्या प्लॅनमध्ये बदल करत बंगल्याचे बांधकाम करण्यात आल्याची तक्रार महापालिकेला २०१७ मध्ये मिळाली होती. या बंगल्याचे बांधकाम हे ‘सीआरझेड’चे उल्लंघन असल्याबाबतची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Discussion about this post