व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्याच्या दृष्टीने माहिती संकलित करुन त्यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आशा स्वयंसेविका कटिबद्ध आहेत.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आर.डी. आगा कम्युनिटी सेंटर, संभाजीनगर येथे आशा स्वयंसेविकांचे पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, शासनाचे आरोग्य शिक्षणाधिकारी बापूराव गर्जे, पब्लिक हेल्थ नर्स शोभा ढोले यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
Discussion about this post