व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या अगोदर अनेकांना अशा प्रकरणात बेड्या ठोकल्याचा उल्लेख करत तंबी दिली आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, ” गणेश मंडळासोबत आमची बैठक झाली आहे. गणपती उत्सव नियमात राहून साजरा करावा. गणपती मंडळांना आवाहन आहे की गणपती उत्सव साजरा करत असताना खंडणीचे गुन्हे काही व्यक्तींवर दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करून बेड्या देखील ठोकल्या आहेत. माझी अशी विनंती आहे सणाला गालबोट न लावता, वर्गणी जबरदस्तीने मागू नये, तस केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.”
तसेच, “रेकॉर्डवरील गुन्हेगारांनावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गणेश उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करू. गणपती उत्सवात गर्दीच्या नियोजनासाठी ड्रोनचा वापर करणार आहोत. शिवाय, महानगर पालिकेच्या सीसीटीव्हीचा वापर देखील करणार आहोत. असं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी म्हटलं आहे.”
तसेच महानगरपालिका या वर्षी गणेशोत्सवासाठी देण्यात येणा-या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची प्रशासनान दक्षता घ्यावी. तसेच गणेश मंडळांना महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून देण्यात येणा-या विविध परवानग्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेली एक खिडकी योजना सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवा, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सिंह यांनी नागरिकांना केले.
Discussion about this post