व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन आणि नाकाबंदी केली.यामध्ये पोलिसांनी 390 आरोपींची तपासणी करण्यात आली.
त्यातील अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, 26 पोलीस निरीक्षक, 55 सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 496 पोलीस अंमलदार यांच्या विविध पथकांनी ही कारवाई केली.पोलिसांनी रेकॉर्डवरील 390 आरोपींना चेक केले.पाच आरोपींवर सीआरपीसी 107 प्रमाणे, दोन आरोपींवर सीआरपीसी 109 प्रमाणे, सीआरपीसी 110 प्रमाणे एकावर कारवाई करण्यात आली.मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे चार, शस्त्र अधिनियमान्वये एकावर कारवाई केली.21 जणांना अटक केली असून फरार असलेले पाचजण या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
974 वाहने चेक करून मोटार व्हेईकल ऍक्ट नुसार 81 वाहनांवर कारवाई केली.यात 51 हजार 325 रुपये दंड आकारला आहे.नॉन बेलेबल वॉरंट सहा जणांना तर बेलेबल वॉरंट चार जणांना बजावले आहे. संभाव्य गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.
Discussion about this post