व्हीएसआरएस मराठी न्युज -आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं.
त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथं संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशावेळी भाजपविरोधात निकरानं झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही धर्मनिरपेक्षतावादी लोकांनी असलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले, सुषमाताई आणि तुमचे लढणारे सैनिक माझ्यासोबत आलेत तेही लढाई ऐन भरात असताना. या साथीसोबतीला महत्व आहे. तीर्थप्रसादाला तर सर्वजण येतात पण लढाईत खांद्याला खांदा लाऊन जे येतात त्यांचं महत्वा आयुष्यभर राहतं. खऱ्याखुऱ्या शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
Discussion about this post