व्हीएसआरएस मराठी न्युज –
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अंतिम टप्पा सुरू आहे. भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये असून या टप्प्यात शिवसेना खासदार संजय राऊतही सामिल झाले.
जम्मूचे तापमान ५ अंश सेल्सिअस असून तिथे पावसाची संततधार आहे. अशा वातवरणातही संजय राऊत यांनी १२ किमीची पदयात्रा केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संजय राऊत यांच्या हृदयात सहा स्टेन्स आहेत. अशा परिस्थितीतही संजय राऊत यांनी रेनकोट न घालताही राहुल गांधी यांच्यासोबत पायवारी केली. 5 अंश सेल्सिअस तापमान, पावसाची संततधार आणि गळ्यात भगवी मफरल घालून राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत संजय राऊत यांनी १२ किमी पदयात्रा केली.
राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. कन्याकुमारी ते जम्मू असा त्यांचा प्रवास असून लवकरच त्यांच्या या भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे. सध्या ही यात्रा जम्मूत असून जम्मूतील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.
Discussion about this post