व्हीएसआरएस न्युज राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. कुठं हलक्या पावसाच्या सरी तर कुठं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला. त्यामुळे या ठिकाणी वीजेचे खांब कोसळून त्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचेही प्रकार घडला.
आज मुंबई, पुण्यासह विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे.
उद्याही राज्यात हीच स्थिती राहणार असून वरील अकरा जिल्ह्यांना उद्याही येलो अलर्ट जारी केला आहे. पण राज्यात इतरत्र मात्र चालू आठवड्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार असून, पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्यानंतर, राज्यात पावसाचा जोर कमी होत पूर्णपणे उघडीप घेतली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे.
Discussion about this post