व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 181 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 02 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 055 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 137 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 61 हजार 761 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 921 अॅक्टिव्हि रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (दि.14) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 7339 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 08 हजार 684 जणांना लस देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार,आज दिवसभरात शहरात 181 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
Discussion about this post