व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात टपरी, हातगाडी यावरती नाश्ता सेंटर सुरू असून महानगरपालिका आरोग्य विभाग अधिकारी तपासणी पथक कोणत्याही प्रकारची चौकशी करत नाही.
ज्या ठिकाणी नाश्ता सेंटर आहे त्या अन्नाबद्दल चांगल्या पद्धतीने बनविलेले जाते का ? तसेच चांगले तेल वापरले जात आहे का ? स्वच्छता राखली जात आहे ? अन्नधान्य खाल्याने नागरिकांना काही त्रास होत होता का? यावर आरोग्य विभाग अधिकारी यांनी कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केले आहे.
शहरातील टपऱ्या, हातगाडे यांच्यावर पालिका अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. फक्त मासिक कचरा गोळा करण्यासाठी २०० रुपये पावती फाडली जाते. त्यामुळे अन्नाचा दर्जा उत्तम आहे म्हणून प्रमाणपत्र मिळत नाही . आरोग्य अधिकारी जबाबदारी ने काम करत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आरोग्य अधिकारी ह्यांच्या विरोधात खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी जेणेकरून अधिकारी चांगल्या प्रकारे काम करतील. सर्व प्रभाग अधिकारी यांच्या विरोधात कारवाई करावी.
तसेच प्रत्येक हातगाडी टपरीधारक येथील अन्नाबद्दल उत्कृष्ट नमुना तपासणी पथक नेमण्यात यावेत. अन्नाचा दर्जा चांगला ठेवण्यात येईल अश्या सुचना महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात यावा. आपण कोविड १९ कोरोणा आजारामुळे गेल्या दिड वषापासून असाह्य झालों आहे सर्व नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहावे. महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब कडक कारवाई करावी मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला पाहिजे म्हणजे ह्या प्रकारावर आळा बसेल भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी म्हटले आहे.
Discussion about this post