व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या जळीत कक्षाच्या प्राथमिक खाटांची क्षमता 15 ते 30 असण्याची शक्यता आहे. खाटांच्या क्षमतेबाबत पुढील आढावा बैठकीत सविस्तर निर्णय घेण्यात येणार असून जळीत कक्षासाठी निवडलेल्या स्थळांची पाहणी आयुक्तांकडून करण्यात येणार आहे. महापालिकेने आगीमुळे होणाऱ्या दुखापतींच्या समस्येकडे लक्ष देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले असून जळीत कक्षाद्वारे पीडितांना उपचार, विशेष काळजी आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक आघातातून सावरण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार आदी उपस्थित होते.
Discussion about this post