व्हीएसआरएस मराठी न्युज –मिठाईलाल वरुण (वय- ४० वर्ष, रा. प्रकाश देवाडीकर यांच्या बंगल्यामध्ये, नारायण कॉप्लेक्स, पांढरकर वस्ती, पंचतारानगर, आकुर्डी) असे मयत इसमाचे नाव आहे.
या प्रकरणी पत्नी आणि १) शिवम दुबे उर्फ दुव्या (वय- २२ वर्ष, रा. आकुडीं आणि २) अमन पुजारी (वय-२४ वर्ष, रा. आकुर्डी) यांना पोलीसांनी अगोदरच ताब्यात घेतले आहे.
विश्वसणीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मिठाईलाल याला आठ मुली आहेत. पैकी एका मुलीचा मृत्यू झाला आहे तर एका मुलीने प्रेम विवाह केलेला आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणुन मिठाईलाल हा आपल्या पत्नीचा छळ करीत असे. वारंवार भांडण करुन तो पत्नीला मारहाण देखील करीत असल्याची माहिती मिळत आहे.
सततच्या या त्रासाला कंटाळलेल्या पत्नी ने पती मिठाईलाल याच्यावर काही दिवसांपूर्वी विषप्रयोग केला. मात्र, मिठाईलाल यामधुन वाचला. पतीकडुन पुन्हा त्रास सुरु झाला.. मग पतीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय पत्नीने घेतला आणि ०५ लाखाची सुपारी दिली.
घरासमोरच राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांना मिठाईलाल ला संपवायची सुपारी दिली.
ठरल्याप्रमाणे गुरुवार (ता.७) रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास या दोघा मारेकऱ्यांनी हत्यारासह मिठाईलाल च्या घरात प्रवेश
केला आणि बेड वर झोपलेल्या मिठाईलाल वर हल्ला चढविला. यावेळी मिठाईलाल ची मुलगी घरामध्ये होती. तिने मारेकऱ्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत काम तमाम झाले आहे असे समजुन मारेकरी पळून गेले.
आरडा-ओरडा झाल्याने शेजारी पाजारी गोळा झाले. पोलीस देखील काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मिठाईलाल ला त्वरीत रुग्णालयात दाखल केले. सुरवातीला निगडीतील खासगी रुग्णालयात नंतर थेरगाव येथील मोठ्या रुग्णालयात मिठाईलाल ला उपचार सुरु झाले.
घडलेली घटना हि धक्कादायक होती. परीसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस उपायुक्त यांच्यापासुन सर्व पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी युद्धपातळीवर मारेकऱ्यांचा शोध सुरु केला.
सुरवातीला मुलीने दिलेल्या माहिती हि दिशाभूल करणारी बाटली. तोंडाला रुमाल बांधलेले, दाढी वाढलेले लोक
होते. अशी प्राथमिक माहिती तिने पोलीसांना दिल्याने पोलीसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. आजुबाजुच्या सीसी टिव्ही मधील फूटेज स्पष्ट दिसत नसल्याने पोलीसांपुढे आव्हान उभे राहिले होते.
मात्र, यावेळी पोलीसांचा अनुभव कामी आला. संशयाची सुई कुटुंबातील व्यक्तींकडे बळली. घरातील सदस्यांकडे पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता पत्नीच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळुन आली आणि दोघांना पोलीसांनी संशयीत म्हणुन ताब्यात घेतले.
पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सत्य पोलीसांपुढे मोकळे केले. पत्नी कडुन ०५ लाखाची सुपारी आणि ०२ लाख अँडव्हान्स घेवुन मिठाईलाल चा गेम केला अशी कबुली त्यांनी पोलीसांना दिली.
निगडी पोलीस ठाण्याचे – वरिष्ठ पोलीस अधिकारी, तपास पथक, प्राधिकरण पोलीस चौकी अधिकारी तथा गुन्हे शाखा युनीट २ चे पथक यांनी योग्य दिशेने तपास करुन खऱ्या मारेकऱ्यांना गजाआड केले आहे.
Discussion about this post