व्हीएसआरएस मराठी न्युज –वायसीएम रुग्णालयाची निर्मिती ही स्व. प्रा. रामकृष्ण मोरे (सर) यांच्या संकल्पनेतून व काँग्रेस विचारातून झालेली आहे. हे रुग्णालय व दवाखाने महानगरपालिकेत कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या करातून बांधण्यात आले आहे. यामध्ये राज्य शासनाचे कोणतेही योगदान नसताना महानगरपालिकेत शासन दराने बिल आकारणे योग्य नाही. शहरातील सर्वसामान्य करदात्यांना योग्य व मोफत आरोग्य सुविधा मिळावी या हेतूने शहरात वायसीएम रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
महानगरपालिकेची एकूण ८ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरीत रुणांना उपचारार्थ आरोग्य सेवासुविधा पुरविल्या जातात. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवासुविधा आणि औषधोपचाराकरिता शासन दराने बिल आकारणी करण्याचे धोरण आपण करीत आहात याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आपण जर महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात व दवाखान्यात शासन दराने वित्त धोरण आपण करीत आहाव याता आमचा पूर्णपणे विरोध आहे. आपण जर महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात व दवाखान्यात शासन दराने बिल आकारण्याचे धोरण रद्द केले नाही तर मोठ्याप्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येईल. अस डॉ कैलास महादेव कदम
अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मा. विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी सांगितले .
Discussion about this post