व्हीएसआरएस मराठी न्युज –महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरात स्वच्छता प्रचारार्थ भव्य रिक्षा रॅली काढण्यात आली होती. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शगुन चौक, रिव्हर रोड, भाटनगर मार्गे, चिंचवड मोरया हॉस्पिटल, चिंचवड स्टेशन, पिंपरी असा रॅलीचा मार्ग होता. या रॅलीचे उद्घाटन मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते झाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त श्री. यशवंत डांगे, विशेष अधिकारी श्री. किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी श्री. प्रफुल्ल पुराणिक तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post