व्हीएसआरएस मराठी न्युज –काँग्रेस अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, या प्रक्रियेतील आज महत्त्वाचा दिवस आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपतेय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आज नेमकं कोण कोण आपला उमेदवारी अर्ज दाखल करतं, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलंय.
एकूण 6 नेत्यांमध्ये अध्यक्षपदाची स्पर्धा असल्याचं बोललं जातंय. अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत माघार घेतल्यानंतर आता नेमकी कुणाकुणाची चर्चा आहे, त्यावर नजर टाकुयात.
- शशी थरुर
- दिग्विजय सिंह
- मल्लिकार्जुन खर्गे
- कुमारी शैलजा
- मीरा कुमार
- मुकुल वासनिक
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम
- आज – अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
- 8 ऑक्टोबर – अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
- 17 ऑक्टोबर – मतदान
- 19 ऑक्टोबर – निकाल
Discussion about this post