व्हीएसआरएस मराठी न्युज –राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला असून नागरिकांनी स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभागी होऊन, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात झाली.
स्वच्छता ही सेवाअंतर्गत एक तारीख एक तास या उपक्रमात अ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत शगुन चौक येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मा. आमदार श्रीम. उमा खापरे, मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह, मा. माजी उपमहापौर श्री. हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, मा. नगरसेवक श्री. संदीप वाघेरे, मा. नगरसदस्य श्रीम. अनुराधा गोरखे, मा. श्रीम. निकीता कदम, मा.सहाय्यक आयुक्त श्री. यशवंत डांगे, मा. क्षेत्रीय अधिकारी श्रीम. सुचिता पानसरे, मा. आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश देशपांडे, मा. जनता संपर्क अधिकारी श्री. प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
Discussion about this post