व्हीएसआरएस न्युज
कुदळवाडी औद्योगिक वसाहतीत नवीन विजेचे खांब व दिवे बसवा..
स्वि. नगरसदस्य दिनेश यादव यांनी कनिष्ठ विद्युत अभियंत्यांची घेतली भेट…
लवकरच काम मार्गी लावण्याचे आश्वासन…
कुदळवाडीत नवीन विजेचे खांब व खांबावरील नादुरुस्त दिवे हटवून नवीन दिवे बसविण्याची मागणी होत आहे. या बाबीची दखल घेत, स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी ‘फ’ प्रभागाचे कनिष्ठ विद्युत अंभियंता दिलीप भोसले यांची मंगळवारी (दि. १५) भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली.
कुदळवाडी हा औद्योगिक वसाहतींचा परिसर आहे. मोठ्या सुविधा अपेक्षित असताना महापालिकेचे नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष होते. परिसरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या वीजेच्या समस्याही पालिकेकडून सुटत नाहीत. या भागात विद्युत खांबांवर एलईडी लाईट लावण्यात आलेले आहेत. परंतु, त्यातील काही एलईडी लाइट बंद स्वरूपात आहेत. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.
वाढत्या विस्तारीकरणामुळे विजेच्या खांबाची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. मात्र, पालिका प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करतेय. ‘फ’ प्रभागाचे कनिष्ठ विद्युत अंभियंता दिलीप भोसले यांना भेटून वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. अधूनमधून होणारे वीज बिघाड दूर करण्याबाबत चर्चा केली. तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यावेळी आयुक्तांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याचे स्मरणदेखील केले.
त्यावर दिलीप भोसले यांनी कुदळवाडी परिसरात नवीन स्ट्रीट लाईट पोल व दिवे बसविण्याकामी खर्चाची आवश्यक ती तरतूद करून समस्या निकालात काढण्याचे आश्वासन दिले.
Discussion about this post