व्हीएसआरएस मराठी न्युज उत्तर प्रदेश चे आमदार पंकज सिंह यांची अध्यक्षपदी तर
महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष ना. सतेज पाटील यांची भारतीय तलवारबाजी संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय तलवारबाजी महासंघाच्या सचिवपदी भारतीय ओलंपिक ओलंपिक महासंघाचे सचिव मा.श्री.राजीव मेहता, छत्तीसगड ऑलिंपिक महासंघाचे सचिव बशीर अहमद यांची कोषाध्यक्षपदी सर महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांची सहसचिवपदी बिनविरोध करण्यात आली.
याप्रसंगी ऑलम्पिक मध्ये पहिल्यांदा तलवारबाजी खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीला भारतीय तलवारबाजी महासंघाच्या वतीने 10 लाख रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला.
Discussion about this post