व्हीएसआरएस न्युज पिंपरी –पिंपरी – महानगर पालिकेची जागा विद्युत विभागाला भाडेतत्वावर देण्याचा अधिकार कुणी दिला असा जाब सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभाेर यांनी एका निवेदनाद्वारे पिपंरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना विचारला आहे.
इंदिरागांधी उद्यान (अधर) येथील जागा विद्युत विभागाने पार्किंग भाडे तत्वावर दिली आहे. विद्युत विभागाला महानगर पालिकेची जागा किंवा मालमत्ता भाड्याने देण्याचा अधिकार नसतांना सुद्धा नियमाची पायमल्ली विद्युत विभागने केली आहे.
भुमी जिंदगी विभाग हे फक्त मालमत्ता किंवा वाहनतळ भाड्याने देवू शकतात तसेच सदर ठेकेदार ह्यांना स्थायी समितीमध्ये तीस वर्षे करारनामा करून दिलेला आहे इंदिरा गांधी उद्यान व वाटर पार्क दोन वर्ष भाडे माफी सुद्धा देण्यात आली आहे महानगरपालिका प्रशासनाकडून
असा आराेप सचिन काळभाेर यांनी केला असून सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून याेग्य ती कारवाई करण्यात यांनी अशी मागणी या निवेदनाद्वारे काळभाेर यांनी केली आहे.
Discussion about this post