व्हीएसआरएस न्युज चिखली-
चिखली, पिंपरी, अशा पिंपरी चिंचवड शहरातील दुचाकी वाहनांची चोरी करून खानदेश व मराठवाड्यातील पाठविणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे हि टोळी मौजमजा करण्यासाठी वाहन चोरून त्या वाहनांची बनावट कागदपत्र तयार करून ती वाहने विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीसांनी या टोळीकडून एकुण 61दुचाकी वाहने असा एकुण 19 लाख 22हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद मुलचंद सोलंकी (वय 25 वर्ष, सध्या रा. अंजिठा नगर, पत्र्याचे शेड चिंचवड , मुळगाव-छाप्रा पोस्ट छोटाटिगरीया, ता. जि. देवास. मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय 28 वर्ष, रा. गोकुळ हीसिंग सोसायटी, यादव यांचे घर, मोरेवस्ती, निखली), सद्दाम अब्दुल शेख (वय 26 वर्ष, रा. ताम्हाणे वस्ती, विठ्ठल रुक्मिणी मंदीरा जवळ, ओम साई सोसायटी, चिखली), आदिनाथ अशोक राजभोज (वय 19 वर्ष, रा. अजिंठा नगर, पत्र्याचे शेड, पाण्याच्या टाकीजवळ, निगडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चंद्रशेखर नोरये हे पेट्रोलींग करीत असताना माहिती मिळाली की, दोन दुनाकी नोरटे बुलेट वरून स्पाईन रोड येथील जॉगर्स पार्क येथे येणार असुन त्यांच्या कडे नोरलेल्या दुनाकी आहेत. मिळालेल्या माहितीनी खात्री झाल्यानंतर पोलीसांनी दुनाकी मोठ्या शिताफिने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बुलेट (एमएन 14 जेएफ 4999) गाडी विषयी व कागदपत्राबाबत चौकशी केली असता त्यांनी ती बुलेट गाडी निखलीतील कृष्णानगर भागातील शांती सदन सोसायटीच्या पार्किंग मधुन चोरली असल्याचे पोलीसांना सांगितले.
पोलीसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरी असल्याचे कबुल करीत केली असल्याचे साथीदारांची नावे सांगितली.
चोरीच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चेतन सावंत, पोलीस नाईक चंद्रशेखर चोरघे, पोलीस नाईक विश्वास नाणेकर, पोलीस नाईक विपुल होले यांच्या पथकाला खाजगी वाहनाने लातुर, नांदेड, परभणी, अहमदनगर, धुळे व जळगाव या जिल्ह्यात रवाना केली. पथकाने विविध जिल्ह्यातुन तसेच स्थानिक परीसरात शोध मोहिम राबवुन एकुण चोरलेली 61 दुचाकी वाहने जम करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, तपास पथकाने पोलीस उप निरीक्षक विवेक कुमटकर, सहायक पोलीस फौजदार आनंद चव्हाण, पोलीस हवालदार चेतन सावंत, सुनिल शिंदे, बाबा गर्जे, किसन वडेकर, पोलीस नाईक चंद्रशेखर चोरघे, विश्वास नाणेकर, विपुल होले, गणेश टिळेकर, कबीर पिंजारी, महिला पोलीस नाईक नुतन कोंडे, पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.
Discussion about this post