व्हीएसआरएस न्युज पिंपरी -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाशिव खाडे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे.
सदर पत्र भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, सरचिटणीस राजू दुर्गे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांनी काम केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य आणि प्रदीर्घ अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खाडे यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Discussion about this post