व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. सुसगाव येथील माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर मित्रांसमवेत राहत होता.
अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर पदावर आहेत. तर अक्षयची जुळी बहीण आकांक्षा माटेगावकर ही लोणी येथील एमआयटी महाविद्यालयात डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेते. ती नांदेड सिटी येथील चुलत्यांकडे राहायला आहे. माटेगावकर कुटुंबातील हे सदस्य आपापल्या क्षेत्रात व्यस्त असताना ही घटना घडल्याने त्यांना मोठा धक्का बसलाय.
वयाच्या 21व्या वर्षी त्याने सुसगाव येथील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून त्याने उडी घेतली, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.
गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने पुण्यात आत्महत्या केली आहे. नोकरी लागत नसल्यानं त्याने हे टोकाचं पाऊल उचलले, तसं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्याने नमूद केलं आहे.
Discussion about this post