व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी पालिकेतील प्रशासकीय राजवटीत नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये साप्ताहिक जनसंवाद सभांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून नागरिकांनी विविध अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
नागरिकांच्या वतीने दिनेश यादवा जनता संवाद सभेला उपस्थित राहुन प्रभागातील नागरिकांच्या पाणी, वीज, ड्रेनेज समस्या तसेच आरोग्य विषयक तक्रारी मांडल्या. या सर्व समस्या आणि तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
त्याचप्रमाणे कुदळवाडी ते मोरे पाटील चौक रस्ता दुरुस्ती,कुदळवाडी पोलीस चौकी समोरील रस्त्यावरील खड्डे, भैरवनाथ मंदिर समोर पाणी समस्या, आदेश पेट्रोल पंप समोरील ड्रेनेज दुरुस्ती, अनेक ठिकाणी पेंव्हीग ब्लॉक दुरुस्ती अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी लहुउद्योजक संघटना सचिव श्री नवनाथ वायाळ हे देखील उपस्थित होते.
Discussion about this post