व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई –मुंबईत आयोजित युथ काँग्रेसच्या बैठकीत तुफान हाणामारी झाली असून दोन गटांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या आहेत. कुणाल राऊत यांना विरोध केल्याने सदरील प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत युथ काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास आणि भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्ण अल्लावर हे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. मात्र, बैठक सुरू असतानाच युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधातील एक गट आक्रमक झाला. काँग्रेसच्या चार उपाध्यक्ष यांनी देखील कुणाल राऊत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना बदलण्याची मागणी केली. त्यामुळे कुणाल राऊत समर्थक आक्रमक झाले.
सध्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कुणाल राऊत यांना पक्षातील अंतर्गत कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यातील शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांना बैठकीमध्येच विरोध केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोरच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Discussion about this post