व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणेकरांना झटका देणारी बातमी सोमर आलीये. तो म्हणजे पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ (CNG) करण्यात आली आहे.
सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलोवरुन 73 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. या वाढीमागचे प्रमुख कारण म्हणेज सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित वायूची वाढ झाली आहे.
सीएनजी गॅस प्रति किलो पाच रुपयांनी महाग झाल्याने याचा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार आहे, आधीच महागाई वाढत आहे.
पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाच्या दरात देखील भरमसाठ वाढ झाली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे सीएनजी देखील महाग झाला आहे.
दरम्यान, एकीकडे सीएनजीच्या दरात आज किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे, मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणेज आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होती.
Discussion about this post