व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्यातील राज्यसभा निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पक्षाने विद्यमान खासदार पी. चिदम्बरम यांना तमिळनाडूत उमेदवारी दिली. महाराष्ट्रातून कवाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे.
मुकूल वासनिक यांना राज्यातून उमेदवारी देण्याचे प्रस्तावित होते. परंतु राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाला विरोध दर्शविल्याने वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याऐवजी प्रतापगढी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
Discussion about this post