व्हीएसआरएस मराठी न्युज –जेजुरी:(ज्ञानेश्वर) प्रतिनिधी दि.१५ रविवार रोजी दुपारी १२:४५ वा.पौर्णिमा प्रारंभ सुरु झाली व ती पौर्णिमा सकाळी सोमवारी ९:४४ वा.संपणार आहे. तसेच श्री खंडॊबाचा वार रविवार, वार व तिथीचे औचित्य साधून सकाळ पासून ते रात्री ९ वा. पर्यंत हजारो भाविकांनी श्री खंडोबारायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्रातून भाविक कुलधर्म व कुलाचारासाठी जेजुरीला येत असतात.तळी भरणे,भंडारा उधळणे,देव भेटविणे,दिवटी पेटवणे आदी धार्मिक विधी गडावर झाले.
सदनंदानाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार असा जय घोष करत भाविक रांगेत राहून दर्शन घेत होते तसेच
मंदिरा समोर उभे राहून मंदिरावर भंडारा उधळत मोठ्याने सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार हा जय घोष करत होते.
विशेषतः नवीन दांपत्य जागरण गोंधळाचे रीती रिवाजाप्रमाणे कार्यक्रम पार पाडताना दिसत होते.कोकण विभागातून कोळी बांधवानी एका पालखीत देव भेटवण्यासाठी गडावर आणलल्याचे पाहायला भेटले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दाखल झाल्याचे दिसून येत होते.
Discussion about this post