व्हीएसआरएस मराठी न्युज –मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बंगाली गायक आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अनुप घोषाल यांचे शुक्रवारी निधन झाले. 1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ या गाण्याला त्यांनी आपला आवाज दिला होता.
वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी 1.40 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. गायकाच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अनूप घोषाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुप घोषाल यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे.
Discussion about this post