व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -सकाळी साडेसात वाजता पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष (सीएसआर) सेलच्या उद्घाटनाने या लोकापर्ण सोहळ्याची सुरवात . खासगी संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजना कल्पना तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासात अधिकाधिक भर घालण्याच्या उद्देशाने हा सेल सुरु करण्यात आले आहे.त्यानंतर पालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा ऑनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ ते करणार आले. त्यात महिला व बालकल्याण योजना,मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग आणि इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मोटार सायकल हे प्रभावी माध्यम आहे. पोलीस पेट्रोलिंगसाठी अशा 50 स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात आले. त्यासाठी 50 लाख 96 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील अरुंद रस्ते, मार्केट परिसर, दाटीवाटीच्या गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्स अत्यंत उपयोगी आहेत. अशा 6 फायटर मोटार सायकल्सचे वाटप अग्निशमन विभागाला यावेळी करण्यात आले.
या मोटर सायकल्स खरेदीकामी 80 लाख 88 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
Discussion about this post