व्हीएसआरएस मराठी न्युज –
पिंपरी-चिंचवड शहराला सव्वा तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे दुर्गानगर, पाटील नगर, शेलार वस्ती, चिखली गावठाणासह चिखलीमधील सर्व रहिवासी सोसायट्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहेत.
आताशी उन्हाळा सुरू होण्याची चिन्हे असतानाच चिखली भागात पाणी प्रश्न गंभीर झाला असून याविरोधात विकासभाऊ साने सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विकास साने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. विकास साने यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांना निवेदन दिले. तसेच चिखली भागातील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
Discussion about this post