व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-निगडी महाराणा प्रताप पुतळा समोर हातगाडी धारक ह्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले म्हणून तसेच मधुकर पवळे पुतळा शेजारी हातगाडी धारक ह्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून फुटपाथ संपूर्ण बंद करून व्यवसाय सुरू केला आहे .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण अधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रिय अधिकारी ह्यांना हातगाडी धारक दर महिन्याला मासिक हप्ता देत असून अतिक्रमण कारवाई करण्यात येतं नाही असे आरोप समाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
रोज संध्याकाळी मधुकर पवळे पुतळा शेजारी पंचवीस ते तीस हातगाडी धारक रस्त्यावर भव्य अतिक्रमण करून व्यवसाय करत आहे निगडी पोलिस व निगडी वाहतूक पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली जात आहे.
नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक महिला वर्ग ह्यांना फुटपाथ बंद करण्यात आल्यामुळे जीव धोक्यात घालून रस्त्यावर कसरत करावी लागत आहे असे सचिन काळभोर यांनी निवेदनात सांगितले .
Discussion about this post