व्हीएसआरएस मराठी न्युज –
मनाेहरपंत जांभेकर यांना अंनिसचा आधारस्तंभ पुरस्कार..
चिंचवड:- दि-३० मार्च २२ (बुधवार) शिक्षणमहर्षी मनोहरपंत जांभेकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘आधारस्तंभ’ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. शतकवीर व आधारस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पुस्तकांचे गाव, भिलार येथे संपन्न झाला. वयोमानामुळे जांभेकर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मनोहरपंत जांभेकर यांच्या निवासस्थानी मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र अंनिसच्या विविध उपक्रम यादीमध्ये ग्रंथदिंडी या उपक्रमाचा समावेश झाल्याचे औचित्य साधून विश्वास पेंडसे यांनी ‘ग्रंथदिंडी’ची माहिती दिली व त्यांचे अनुभव कथन केले. पिंपरी चिंचवड परिसरात वाचन संस्कृती अधिक रुजावी यासाठी ”ग्रंथदिंडी ऑन व्हील’ हा उपक्रम गेली आठ-नऊ वर्षे त्यांनी यशस्वीरीत्या चालवला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र कांकरिया होते. कार्यक्रमाला शुभांगी घनवट, अलका जाधव, ईला पवार, रामभाऊ नलावडे, सुभाष सोळंकी, चारूदत्त बुद्धीसागर, अशोक जाधव, सर्जेराव कचरे सर, श्रीनिवास गडकरी, रवीकर पाठक, हुरहिंद पठाण उपस्थित होते.
विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याची गरज आहे.
महाराष्ट्र अंनिसचे समाज प्रबोधनाच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करताना शालेय मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व प्रश्न विचारण्याची चिकित्सक वृत्ती वाढीस लागावी, यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे व अधिक गरजेचे आहे.
:- मनोहरपंत जांभेकर
Discussion about this post