व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापलिका आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची बदली एका क्षेत्रीय कार्यालयातून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून, प्रशासनाने प्रभागांतर्गत बदली करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.
अन्य क्षेत्रीय कार्यालयात बदली केल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही कामगारांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे. वयोमानानुसार काहीजणांना अन्य ठिकाणी कर्तव्य बजावण्यात आव्हानात्मक होत आहे. काही अंशत: अपंग कर्मचारी आहेत. निवासाजवळ काम असल्यामुळे वेळेवर कामावर येणे शक्य होणार आहे. त्यामुळे बदलीला विरोध नाही. मात्र, आहे त्याच प्रभागामध्ये बदली व्हावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याशी तात्काळ फोनवर संपर्क साधला आणि कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत चर्चा केली. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संबंधित ६८ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post