Pimpri News : पिंपरी :मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही घटकपक्षांच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक उद्या ८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे असलेल्या रागा पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे.
या बैठकीला अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत हे नेते उपस्थित राहून पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रचाराचे नियोजन, जबाबदार्यांचे वाटप आणि तिन्ही पक्षातील समन्वय या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.
महायुतीच्या घटकपक्षांच्या पदाधिकार्यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post